धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी अमळनेररात रस्ता रोको…
सकल धनगर समाजाकडून रास्तारोको
अमळनेर : तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने शहरातील पैलाड भागात चोपडा नाक्यावर धनगर समाजास एस टी संवर्गात समाविष्ट करण्यात यावा या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील पंढरपूर, लातूर,नेवासा फाटा व पुणे येथे धनगर बांधव उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून अमळनेर तालुक्यातील सकल धनगर समाज मोठ्या संख्येने आपल्या सोबत शेळ्या – मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरले व शहरातील चोपडा नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात धनगर समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्यामुळे रस्ता व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
दरम्यान अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी आंदोलकांची संवाद साधत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. व आपल्या संपूर्ण मागण्या प्रशासनाकड़े त्वरित पाठवतो असे आश्वासन दिले. यावेळी बहुसंख्येने उपस्थित असलेल्या धनगर समाज बांधवांच्या घोषणांनी परिसर दणाणून
गेला होता.
याप्रसंगी वसुंधरा लांडगे, डी ए धनगर प्रा. लक्ष्मण निळे,सेवानिवृत्त पीआय हिरामण कंखरे,चेतन देवरे यांनी आंदोलनाची भूमिका मांडून उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केले.
आंदोलनात मच्छिंद्र लांडगे नितीन निळे , समाधान धनगर, जिभाऊ कंखरे, गोविंदा कंखरे, सुधाकर पवार, विलास लॉंडगे, शिरसाठ, धनराज कंखरे, दिलीप शिरसाट, संजय शिरसाट, पंडित लांडगे, राजू मोरे, दीपक लांडगे, पिंटू लांडगे, प्रताप कंखरे, बापू मिस्तरी, संतोष लांडगे, तुषार इथे, शशिकांत लांडगे, रमेश बिहडि, वसंत बित्हाडे, नाना शिरसाट, समाधान लांडगे, सतीश धोडू, भिका लांडगे,मुरलीधर मोरे, शशिकांत आढावे, प्रीतम रत्नपारखी, उमेश मनोरे यांसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.