शीतल घोगले हत्या प्रकरणातील आरोपींना २७ पर्यंत पोलीस कोठडी…
अमळनेर : रविवारी सकाळी शीतल जय घोगले ह्या गांधलीपुरा येथील महिलेची हत्या झाल्याचे उघड झाले होते, ह्या महिलेला कोणी मारले असावे या बाबत शहरात विविध तर्क-वितर्क लावण्यात येत होते, मात्र शीतलच्या नणंदनेच तिचा घात केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. या गुन्ह्यातील मयत महिलेची नणंद मंगला परशुराम घोगले व तिचा प्रियकर करण मोहन गटायडे यांना पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली होती.
आरोपी मंगला घोगले व करण गटायडे या दोघांना काल सोमवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता मंगला व करण या दोघांना २७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान मयत शीतल घोगले हिचे धुळे जिल्हा रुग्णालयात इन कॅमेरा शवनिच्छेदन करण्यात आले असून काल दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.