महार वतनी जमिनी चालतात मग त्यांना घरे का देत नाहीत…?
ते पण तर घराच्या मोबदला देणारच आहेत ना
अमळनेर : गेल्या अनेक दिवसांपासून दिव्य लोकतंत्रने अमळनेर मधील जातीयवादी बिल्डर लोकांच्या विरोधात सत्र सुरू केले आहे. कारण ही लोक अमळनेर मधील बौद्ध, मेहतर व मुस्लिम या जातींनी घरे देत नाहीत. असे करून ते जातीयवादास पोसत असल्याचे अनेकांचे मत आहे. सोमवारी दिलेल्या वृत्तात दिव्य लोकतंत्रने मांडले होते की, बौद्ध, मेहतर व मुस्लिम लोकांकडून अनेक कामे करून घेणे तुम्हाला चालते तर त्यांना घरे देणे का चालत नाहीत? असाच आजचाही विषय आहे.
यापूर्वी बौद्ध समाज म्हणजे तत्कालीन महार समाज यांना गावाच्या सेवेच्या मोबदल्यात वतन जमिनी दिल्या जात असतं, ह्या जमीनीचा त्यांना शेतीसाठी वापर करावा लागत असे, तेव्हाचे लोकं अशिक्षित असल्याने त्यांच्याकडून अनेकांनी ह्या जमिनी बडकवल्या व आज त्यांच्यावरच हुकूम करीत असून त्यांच्यावर अन्याय देखील करीत आहेत.
अमळनेर तालुक्यासह शहरात देखील हीच परिस्थिती असून अमळनेर शहरातील काही बिल्डर्स लोकांनी ह्या जमिनी बडकवल्या आहेत, व सध्या त्या ठिकाणी आपला व्यवसाय मोठ्या थाटाने सुरू केला आहे. म्हणून या जमिनींची चौकशी होऊन ज्यांनी ह्या जमिनी बडकवल्या आहेत त्यांच्याकडून परत घेऊन मूळ वारसदारास त्या जमिनी मिळाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कारण ह्या लोकांना बौद्ध / महार समाजाला गाव सेवेच्या बदल्यात देण्यात आलेल्या महार वतनी जमिनी चालतात तर मग ह्या लोकांना घरे देणे का चालत नाही असा प्रश्न उपस्थित होतो. कारण ही लोकं देखील बिल्डर्स लोकांना घरांच्या मोबदल्यात किंमत देणार आहेतच ना !