पोलिसांच्या मेहनतीला सलाम

अमळनेर : शहरात गणेशोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने गणरायाला निरोप देण्यात आला. गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी शहरात अनेक मिरवणूका निघून शांततेत निघाल्या. प्रामुख्याने दगडी दरवाजाच्या आतून आलेल्या मिरवणुका लक्षवेधी असल्याने सदर मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
अनेक मंडळांनी दिवसा तर अनेकांनी जागेवरच वाद्य वाजवून वेळेच्या आत विसर्जन केले. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी ,कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हॅन्डी कॅमेरे आणि दोन ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने करडी नजर ठेवण्यात आली होती. अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर स्वत नियंत्रण ठेऊन होत्या. तर दोन डीवायएसपी , अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह तीन पोलीस निरीक्षक , १५ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक , एक आरसिपी प्लाटून , दोन एसआरपीएफ प्लाटुन, दोन ट्रॅकिंग फोर्स , १०० पुरुष कर्मचारी , ५० महिला कर्मचारी, १०० होमगार्ड असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व मुख्याधिकारी तुषार नेरकर हे देखील परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होते.
पालिका विद्युत विभागाने विविध चार ठिकाणी जनरेटरची व्यवस्था केल्याने दोनदा लाईट जाऊनही गोंधळ उडाला नाही.

मिरवणूका आटोपत पोलिसांना सकाळी 5 वाजले तरी पोलिसांनी न थकता तगडा बंदोबस्त ठेवला होता, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहायक पोलीस निरीक्षक गावित, पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, भगवान शिरसाठ, निंबा शिंदे यांसह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. म्हणून पोलिसांच्या मेहनतीला सलाम !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!