हाती पैसा घेऊन घर मागितले; मात्र तरी घर दिले नाही…
पुरोगामी मुखवट्याआड जातीयवादाची कीड…
ना जातीसाठी, ना मातीसाठी, ना विचारधारेसाठी आम्ही जगतो फक्त स्वार्थासाठी…
अमळनेर : पुरोगामी मुखवट्याआड जातीयवादी कीड लागलेल्या महाविकास आघाडीतील या दोन नव्हे तर तीन विधानसभा इच्छुक उमेदवार व स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या बिल्डर्स पैकी एक आहे ज्याची आपण कथा वाचणार आहात. आणि आज आपण हे देखील वाचणार आहोत की अमळनेर मधील हे बिल्डर्स तीन जाती म्हणजे कोणत्या आहेत ज्यांना ही लोकं घरे देत नाहीत.
अमळनेर मधील बिल्डर लोकांची यशोगाथा जेव्हा पासून सुरु केली तेव्हा पासून अनेक वाचकांनी त्या बिल्डर्स व त्यांचे कारनामे आम्हाला सांगितले. यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढू इच्छिणाऱ्या या एकाने तर सरळ लोकं पैसे घेऊन मागे फिरत असताना सुद्धा घरं दिली नाहीत. अनेक नौकरदार – प्राध्यापक लोकं सुद्धा याकडे घरे घेण्यासाठी गेली असता त्याने घरं देण्यास नकार दिला, ही लोकं पैसे घेऊन त्याच्या मागे फिरत होती मात्र तरी त्याच्या जातीयवादी मानसिकतेने त्याला घरे देण्याची परवानगी दिली नाही… म्हणून याच्यासाठी एक ओढ चांगली जुडत की, “ना जातीसाठी, ना मातीसाठी, ना विचारधारेसाठी आम्ही जगतो फक्त स्वार्थासाठी…
आता तर ठीक आहे पण यदाकदाचित यास तिकीट मिळाले तर “प्र-शांती” नक्की होईल व यातून तो व्यक्ती “नाकाम” होईल हे मात्र नक्की !
अमळनेर मधील बिल्डर्स घरे देत नाहीत या तीन जातींना…
अमळनेर शहरातील बिल्डर्स असलेल्या लोकांच्या मनात जातीभेद कुटून – कुटून भरला गेला असून ते शहरात काही जातींना घरे देत नाहीत, या बाबतीत त्यांनी जणू या जातींवर बहिष्कार टाकला आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो.
कारण
(१) बौद्ध
(२) मुस्लिम
(३) मेहतर
अशा तीन जातींना अमळनेर मधील बिल्डर्स घरे देत नाहीत याचे आमच्याकडे पुरावे आहेत.
यात आता काही बडे व धनदांडगे बिल्डर्सचे देखील नावे यादीत आले आहेत. याचा देखील खुलासा लवकरच केला जाणार आहे.