विद्यमान लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करत आहेत…
डॉ. अनिल शिंदे यांची लोकप्रतिनिधींवर टीका
अमळनेर : तालुक्यासह इतर तालुक्यांचा ज्वलंत असा पाडळसरे धरण हा विषय आहे. या धरणाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करीत असल्याचे काँग्रेसचे नेते डॉ. अनिल शिंदे यांनी म्हटले आहे.
पाडळसरे धारणाचा जुमला अमळनेरचे जुमलेबाज लोकप्रतिनिधी केंद्र सरकारच्या जुमल्यावर करीत आहेत. खरं तर त्यांना गुजरातला पाणी कमी पडू नये म्हणून ते भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसलेले विद्यमान लोकप्रतिनिधी अमळनेर शहरात व तालुक्यात होल्डिंग्ज लावून अमळनेर तालुक्यातील जनतेची दिशाभूल करीत असल्याची टिका डॉ. अनिल शिंदे यांनी केली आहे.