हिंगोणे खु. येथील शेतकऱ्याची कापूस बियाण्यात फसवणूक…

0

लागवड करून 3-4 महिने होऊनही कुठलेही फुले-फळे आले नसल्याने प्रशासनाकडे तक्रार

 

अमळनेर : तालुक्यातील हिंगोणे बु. येथील शेतकऱ्यांची कापूस बियाण्यात मोठी फसवणूक झाली आहे. सुमारे 3 -4 महिन्यांचा कापून होऊनही कुठल्याही प्रकारचे फुल अथवा फळ आलेले नाही, तर यामुळे संबंधित कंपनीने देखील चौकशी केली असता त्यानंतर देखील काही फरक पडला नाही म्हणून शेतकरी महेंद्र भाऊलाल ठाकरे यांनी अमळनेर तालुका कृषी अधिकारी व गट विकास अधिकारी अमळनेर यांच्याकडे तक्रार करत नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे.

ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी मौजे हिंगणे खुर्द तालुका अमळनेर येथील शेतकरी असून मी जून 2024 मध्ये धन्या (टाटा) सिड्स या कंपनीचे इशा वाण बियाणे लॉट नंबर S7DB773 बियाणे घेऊन कपाशीची लागवड केलेली आहे.. असे असताना जुन 2024 मध्ये शेत गट क्रमांक गट 41 हिंगोणे सिम येथे बागायत क्षेत्रात कपाशीची लागवड केलेली आहे.
सदर कपाशी पिकास लागवड करून आज पावतो तीन महिने झालेले असून कुठलीही फुल अथवा फळ धारणा झालेली नाही. आज पावेतो आमचा शेतीच्या मशागतीसाठी निंदणी खत-खते फवारणी व आवश्यक मंजुरी देखील घरातून खर्च झालेला आहे.. मी शेतकरी या नात्याने वरील विषयातील कंपनी यांच्या प्रतिनिधीला वैयक्तिक रित्या मी मोबाईल वरती संपर्क साधून बियाण्याबाबत शंका व्यक्त केली. अधिकारी प्रतिनिधी प्रत्यक्ष शेतात आले सदर कंपनीचे अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे कपाशीची शेंडा मोड करून आवश्यक ती फवारणी केली परंतु असे करूनही अद्याप पावेतो कपाशीला कुठलेहि फळधारणा आलेली नाही. मी एक गरीब कुटुंबातील शेतकरी असून माझ्यावरती शेतमशागत कामी भरपूर कर्ज झालेले आहे. तसेच सदर कर्ज जिल्हा बँक अथवा नॅशनल बँकेचे कर्ज मी शेतीवरती सदर पीक घेण्यासाठी घेतलेले आहे, बँकेचे कर्ज घेते वेळी शेताला आवश्यक पुन्हा मजुरी खत बियाणे कामी माझे नातेवाईक मित्रांकडून हातुसनवार रक्कम देखील घेतलेले आहे मी आज कर्जात बुडलेलो आहे. तरी कृषी विभागाबे माझ्या अर्जाची सखोल चौकशी करून मला शासना अथवा कंपनीकडून आवश्यक सातबारा वरती कपाशी क्षेत्रप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी अशा विनंतीपर तक्रारी अर्ज तालुका कृषी अधिकारी व गट विकास अधिकारी अमळनेर यांना देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!