उमेश पाटलांच्या प्रचार रथाचे उद्घाटन
आता मतदार संघात फिरणार तुतारी वाजवणारा १२ फुटी माणूस
अमळनेर : येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश रावसाहेब पाटील यांनी अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी तयार केलेल्या प्रचार रथाचे शुक्रवारी जळगाव जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष मालकर, जळगाव जिल्हा समन्वयक विकास पवार, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, रिता बाविस्कर, प्रशांत निकम, अनंत निकम, तिलोत्तमा पाटील, अशोक पवार, श्याम पाटील, योजना पाटील, कविता पवार, संजय पुणाजी पाटील, परेश शिंदे, प्रवीण पाटील, प्रल्हाद पाटील, दिगंबर पाटील, मनोहर पाटील, डी एम पाटील, रवी जाधव, डी एम पाटील,अक्षय पाटील तसेच तालुक्यातील इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
उमेश पाटील यांनी तुतारी वाजवणारा माणूस हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे चिन्ह आहे त्या चिन्हाची 12 फुटाची प्रतिकृती बनवून घेतली आणि ते प्रत्येक गावात तसेच शहरात फिरवली जाणार आहे. व लोकांपर्यंत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जास्तीत जास्त कसे जाईल याचा प्रयत्न करणार आहेत. महाराष्ट्रात असा प्रयोग विधानसभेसाठी कुठेच झालेला नाही. सर्व इच्छुक उमेदवारांपेक्षा वेगळ्या पद्धतीने प्रचार यंत्रणा तयार करून उमेश पाटील यांनी आघाडी घेतलेली आहे.