धनदाई महाविद्यालयात जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
अमळनेर : येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटक म्हणून विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदिप नेरकर हे तर प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री हॉस्पिटलचे डॉ. विक्रांत पाटील, डॉ. मयुरी पाटील, डॉ.प्रियंका पाटील, माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील, संचालिका प्रमिलाताई पाटील, सूर्यवंशी लॅबचे किशोर सूर्यवंशी, ऐस. एम. पाटील, बन्सीलाल भागवत हे तर अध्यक्ष म्हणून धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डी.डी . पाटील हे उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात आयोजित या शिबिराचे प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील यांनी जेष्ठ नागरिकांसाठी कोरोना पूर्व व कोरोना नंतरच्या काळात महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध उप्रक्रमांची माहिती दिली. उदघाटन प्रसंगी सिनेट सदस्य डॉ. नेरकर यांनी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे आयोजित विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देऊन धनदाई महाविद्यालयाने नेहमीच जेष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या प्रसंगी डॉ. विक्रांत पाटील व डॉ. मयुरी पाटील तसेच डॉ. प्रियंका पाटील यांनी जेष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात त्यांची ब्लड शुगर, ब्लड प्रेशर व इतर तपासण्या करण्यात येऊन त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
या आरोग्य तपासणी शिबिरासाठी सुमारे ८० जेष्ठ नागरिक उपस्थित होते. महाविद्यालयातर्फे शिबीर समन्वयक डॉ. भगवान भालेराव यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. किशोर पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत पाटील, डॉ. प्रविण पवार, राजेंद्र पाटील, कैलास आहिरे, विष्णू शेट्ये, दगडू पाटील, विनोद केदार, डॉ. संगीता चंद्राकर, प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रा. मेघना भावसार, प्रा. सागर सैंदाणे, प्रा. जितेंद्र पवार या सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.