सरपंचांच्या विविध मागण्यांसाठी अमळनेरच्या सुषमा देसले आक्रमक
सरपंच परिषदेकडून विविध मागण्यांसाठी मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन
अमळनेर : गाव खेड्यांच्या व सरपंचांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी सरपंच परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुषमा देसले चांगल्याच आक्रमक झालेल्या दिसल्या. संघटनेच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. राजमल भागवत, जिलाध्यक्ष बालू धूमाल ,सौ कल्याणी पाटिल, शितल पाटील, वर्षा पाटील, जोत्सना लोहार, श्रद्धा पाटील, शितल जोगी, स्वरा पाटील, नबाब तडवी, गणेश महाजन, श्रीकांत पाटील, युवराज पाटील, निर्दोष पवार, गणेश पाटील, अतुल चौधरी यांच्या नेतृत्वात सुमारे दोनशे पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी धडक भेट दिली ,मंत्री महाजन यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना वेळ देवून त्यांचे म्हणणे सविस्तर ऐकून सकारात्मक प्रतिसाद देवून तात्काळ मागण्या मार्गी लावण्याचेआश्वासन दिले आहे, व परिषदेला आंदोलन करण्याची गरज भासू देनार नाही असे सांगीतले आहे.