अमळनेर काँग्रेसचा बूथ मेळावा संपन्न
मात्र डॉ. अनिल शिंदे व इतर काँग्रेस नेते मेळाव्यास अनुपस्थित
अमळनेर : तालुका काँग्रेस कमिटीची बैठक 9 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे संपन्न झाली. सदर बैठकीला तालुक्यातील व शहरातील सर्व बुथ प्रमुखाना ( बु थ लेवल एजंट) यांना बोलावण्यात आले होते. जवळपास 275 ते 340 बूथ प्रमुखांसह महिलांची उपस्थिती होती. यावेळी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप पवार हे उपस्थित होते. तसेच जळगाव जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, जळगाव जिल्हा काँग्रेस व्ही जे एन टी अध्यक्ष, सुभाष जाधव, धरणगाव शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष, अनंत परिहार व विधानसभेसाठी इच्छुक के. डी. पाटील, संदीप घोरपडे यांची देखील उपस्थिती होती. सर्व आलेल्या पाहुण्यांचे व काही पदाधिकाऱ्यांच्या स्वागतानंतर, अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात बूथ प्रमुखांचे महत्व व त्याच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. त्यानंतर शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी तालुका व शहर काँग्रेस कमिटीची भूमिका स्पष्ट करताना आम्ही महाविकास आघाडीचे पाईक असून, तंतोतंत आघाडी धर्म पाडणार असल्याने, आमदारकीची शिफारस कोणालाही झाली तरी काँग्रेस पक्ष भक्कमपणे त्याच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी उभा राहण्याचे ठणकावून सांगितले. त्यानंतर लोकसभेच्या मतदाना वेळी उत्कृष्ट प्रकारे भूत सांभाळल्याबद्दल श्रीमती शोभा गढरे व चतुर्थश्रेणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल नगरसेवक राजू संधान शिव यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी त्यांच्या सर्व अनुभवाचे कथन करून, उदाहरणे देऊन, बूथ प्रमुखांच्या भूमिकेचे महत्त्व सांगितले. येत्या विधानसभेसाठी जिल्ह्यातील कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटेल, यासंबंधीची कार्यवाही वरच्या स्तरावर सुरू आहे. अजून निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले. त्यासंबंधी अफवांवर विश्वास ठेवू नये असेही सांगितले. तसेच मुंबईच्या काँग्रेसच्या सभा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदेश यांचे पालन करताना, संपूर्ण जळगाव जिल्ह्याची परिस्थितीचे वर्णन केले. व अमळनेरला बूथ प्रमुखांच्या सभेची सुरुवात असून, सर्वत्र अकरा तालुक्याच्या ठिकाणी बी एल ए च्या बैठकीचे आयोजनाचे सुतो उवाच केले. अगदी हसत खेळत पवार यांनी सर्व बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भाषणात खिडवून ठेवले. शेवटी बूथ प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये प्रसाद कापडे, विवेक पाटील – माजी सरपंच ढेकू, तुकाराम चौधरी, लोटन पाटील यांनी त्यांच्या समस्या मांडल्या त्याचे निराकरण जिल्हाध्यक्ष यांनी केल्याचे समजते. त्यानंतर सुभाष जाधव यांचे भाषण झाले. शेवटी सर्वांचे आभार मानत असताना संदीप घोरपडे यांनी नाट्यगृह बैठकीस मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे बी.के सूर्यवंशी यांनी त्यांचे विशेष आभार मानले. बैठकीस श्री शांताराम बापू पाटील, गोकुळ बोरसे, काकाजी देशमुख, प्रा शाम पवार, राजू फाफोरेकर, गजेंद्र साळुंखे, मेघराज पवार, अलीम मुजावर, तुषार संदानशिव, महेश पाटील, विठ्ठल पवार, अशोक पाटील, पार्थ राज पाटील, विवेक पाटील, प्रवीण जैन, अनिल पाटील, वसंतराव पाटील, अमळनेर शहर महिला अध्यक्ष नयना पाटील, वैशाली मोरे, दास भाऊ, तनवीर शेख, अनवर खाटीक, अल्ताफ शेख, विवेक पाटील, देविदास पाटील, रोहिदास दाजी, लोटन अण्णा चौधरी, दिलीप पाटील, राजू भाट, प्रवीण जैन, विश्वास पाटील, अमित पवार, बंशीलाल पाटील, डॉक्टर एन बी बागुल, कैलास कोळी, भगवान संधान शिव, विशाल परदेशी, गुलाब पाटील, दिनकर पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, पुनीलाल पाटील, पवन शिंदे, सलीम शेख, गौतम भोई, ज्ञानेश्वर कोळी, मधुकर पाटील, अनिल पाटील. इत्यादी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मात्र या बूथ कार्यकर्ता मेळाव्यास अमळनेर काँग्रेसचे नेते डॉ. अनिल शिंदे, प्रा. सुभाष पाटील तसेच इतर नेते अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे. अमळनेर काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याचा हा दुसरा अनुभव असून याकडे काँग्रेसच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.