के.डी.गायकवाड विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहाने संपन्न…
विद्यार्थ्यांनी नोंदविला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर : शहरातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता १२ वीची विद्यार्थी कु. नयना किरण पाटील हिने मुख्याध्यापक म्हणून शालेय कामकाज पाहीले. तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवस शिक्षक म्हणून कार्य केले. शिक्षक विद्यार्थ्यांना कसे घडवतात व त्यांना येणाऱ्या अडचणी कश्या सोडवल्या जातात यांचा अनुभव विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातुन व्यक्त केल्या. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. व्ही. नेतकर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहीती दिली व जिवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत कशी करावी यांची माहीती करून दिली. शिक्षक बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ए. व्ही. नेतकर यांनी बक्षिसे दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सरचिटणिस डी.डी.पाटील होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. अजिक्य पाटील , प्रा.सुशिल पाटील , प्रा.हर्षल पाटील यांनी केले. सुत्रसंचालन शिक्षिका पुनम पारधी यांनी केले. या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.