शालेय शासकिय खो खो क्रीडा स्पर्धेत जी एस हायस्कुल चे दुहेरी यश…..
अमळनेर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद जळगाव तसेच अमळनेर तालुका क्रीडा परिषद आयोजित शासकिय शालेय खो – खो तालुका स्तरिय क्रीडा स्पर्धा नुकत्याच प्रताप महाविदयालच्या मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेत खा. शि. मंडळाच्या जी एस हायस्कुल येथील १४ / १७ वर्षाआतील मुलांनी आपल्याच उत्कृष्ट खेळामुळे दुहेरी विजेते पद खेचून आणले व आता या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असुन या स्पर्धेत राज्यस्तरीय खेळाडू जयेश धनगर , कृष्णा महाजन , दुर्गेश कोळी यांनी सर्व संघाना आपल्या कौशल्यदार खेळामुळे पराभुत करुन प्राविण्य मिळविले आहे.
१४ वर्ष वयोगटात कर्णधार धिरज येवले , आदित्य सानफ ,खुशराज बडगुजर ,उपकर्णधार तेजस पाटील , दर्शन पाटील , दुर्गेश सोनवणे , देव संदानशिव , पुनीत पाटील , प्रणव बडगुजर ,प्रथमेश परदेशी , यश मिस्तरी यांचा समावेश होता.
तर १७ वर्ष वयोगटात कर्णधार जयेश धनगर , उपकर्णधार कृष्णा महाजन ,अमोल अहिरे ,आर्यन रोकडे , उत्कृर्ष पाटील , कृष्णदास बाविस्कर , दुर्गेश कोळी ,नयन पाटील ,नरेश सोनवणे ,परेश महाजन ,प्रंशात कोळी , मयुर महाजन ,रणजीत पावरा , साई पाटील, ऋषिकेश महाजन आदी होते.
वरिल संघास दुहेरी विजेतेपद मिळाल्याबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डाॕ संदेशजी गुजराथी , संस्थेचे संमन्वय समिती चेअरमन डाॕ, अनिल शिदे ,शालेय समिती चेअरमन हरि भिका वाणी, संचालक योगेश मुंदडे, संचालक प्रदीप अग्रवाल , संचालक विनोद पाटील ,संचालक कल्याण पाटील, शिक्षक प्रतीनीधी विनोद कदम , मुख्याध्यापक बी एस पाटील , उपमुख्याध्यापक ए डि भदाणे, पर्यवेक्षक एस आर शिंगाणे, पर्यवेक्षक सी एस सोनजे, शाम पवार , जैन तथा सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करुन जिल्ह्यास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. वरिल खेळाळुंना क्रीडाविभाग प्रमुख व शिक्षक प्रतिनीधी एस पी वाघ , व जे व्ही बाविस्कर यांचे मोलांचे मार्गदर्शन लाभले.