लोकमान्य विद्यालयातील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न
अमळनेर : लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात “हरितसेना” अंतर्गत पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले. शाडू मातीपासून गणेश मूर्ती कशी तयार करावी यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन यांनी स्वतः विद्यार्थ्यांना गणेश मुर्ती तयार करून दाखवित मार्गदर्शन करण्यात केले. विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून अतिशय आकर्षक मूर्ती तयार केल्या व स्वंयनिर्मितीचा आनंदही घेतला. यावेळी मनोहर महाजन यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांचे दुष्परिणाम सांगून पर्यावरण वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यापुढेही आपल्या घरी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मुर्त्यांचीच स्थापना करा असे सागितले. यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षिका मनिषा खांजोडकर, हरितसेना प्रमुख सायली देशपांडे, उपशिक्षक भूषण महाले, आशा सोनवणे, संदिप महाजन तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.