संशोधनात गुणवत्ता व विश्वासहर्ता महत्वाची…. डॉ. भी. ना. पाटील यांचे प्रतिपादन
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त), राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियान व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अरुण जैन हे होते,त्यांनी यावेळी महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्तविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. धनंजय चौधरी यांनी केले तर प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. विजय साळुंखे यांनी करून दिले. या वेळी मंचावर खा.शि.मंडळाचे सह सचिव तथा अधिसभा सदस्य डॉ. धिरज वैष्णव, उप प्राचार्य डॉ.विजय तुंटे, डॉ.विजय मांटे, डॉ.कल्पना पाटील, डॉ.धनंजय चौधरी,प्रा.अवित पाटील उपस्थित होते.
प्रस्तुत साने गुरुजी सभागृहात इतिहास संशोधक डॉ.भी ना पाटील यांचे सामाजिक शास्त्रातील संशोधन या विषयावर मूलभूत स्वरूपाचे व्याख्यान झाले,ते म्हणाले की मानवाच्या गरजा ह्या अनंत आहेत,आपली जिज्ञासा व उत्सुकता लक्षात घेऊन विषयाचा सखोल अभ्यास करावे.
सामाजिक शास्त्रात जवळपास 64 विषयांचा समावेश होतो, या अंतर्गत शास्त्राचा अभ्यास करण्याची एक रीत पद्धतशीरपणे पुढे आली.
शास्त्र हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ व्यवस्थेचे सुंदर नियमन करणे महत्वाचे असते.आशय फार महत्वाचे नसून पद्धत किंवा तर्कशुद्ध अभ्यास उपयुक्त मानले जाते,शास्त्र व विज्ञान या दोन्ही गोष्टी अध्ययन दृष्टीने महत्वाचे आहे. आज अभ्यास व संशोधन यास विशेष महत्व प्राप्त झाले.मानवी जीवनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अभ्यास करण्यावर भर दिले जाते.
विज्ञानास एक पद्धत आहे,तर सामाजिक शास्त्रात सुद्धा पध्दत आहे, त्यास अनुभवजन्यतेची जोड आहे.
सामाजिक शास्त्रात खालिल स्वरूप लक्षात येते
1) नैसर्गिक शास्त्र
2) सामाजिक शास्त्र
3) आदर्शवादी शास्त्र
4) घटनावादी शास्त्र
सामाजिक शास्त्रात काही वैशिष्ट्य सुद्धा महत्वाचे आहेत उदा:
1) पूर्व कथन
2) स्पष्टता
3) तथ्यांचे संकलन
4) तटस्थता
5) चौकसपणा
6) सातत्य
याचप्रमाणे संशोधनात वर्गीकरण सुदधा महत्वाचे आहे उदा:
1) शुद्ध सामाजिक शास्त्र
2) अर्ध सामाजिक शास्त्र
3) अर्थ सांगणारे शास्त्र
उपरोक्त मुद्दे महत्वाचे असले तरी
निरीक्षण,सामान्यकरण,गृहीतके हे सुद्धा अभ्यासणे मानव्य विद्या शाखेत आवश्यक आहे.चांगले निष्कर्ष निघतील अशी मांडणी महत्वाचे आहे.शोध व संशोधन यात सूक्ष्म फरक आढळतो.
सामाजिक शास्त्राची व्यवस्था ही मुक्ती साठी आहे म्हणून या विद्या शाखेत संशोधनास खूप मोठी व्याप्ती आहे. विद्यार्थ्यांचे वाचन व ग्रंथाशी कायमचा संबंध असणे त्यांच्या भवितव्यासाठी उपयुक्त आहे.आपल्या शोधाचा उपयोग समाजास व शासनास फायदेशीर ठरत असेल तर त्याचे मूल्य लक्षात येते.
सदरच्या कार्यक्रमास अधिसभा सदस्य प्रा.डॉ.संदीप नेरकर,डॉ.निलेश चित्ते,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.रवी बाळसकर,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.विलास गावित,डॉ.रवींद्र मराठे,प्रा.भाग्यश्री जाधव,प्रा.दिलीप तडवी, डॉ.हर्ष नेतकर,प्रा.प्रसाद मुठे,प्रा.सोनूसिंग पाटील,प्रा.प्रियंका चावडा,प्रा.विक्रांत निकम,प्रा.कोकणी यांच्या सह सामाजिक शास्त्रातील 70 विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी टी वाय बी ए च्या अंतिम वर्षात व एम ए प्रथम वर्षात पहिले आलेले भाग्यश्री महाले यांचा सत्कार माजी प्राचार्य भी ना पाटील यांनी केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अवित पाटील यांनी केले तर आभार प्रा.भाग्यश्री जाधव यांनी मानले.