गोगादेवी जयंती निमित्त अमळनेरात महादेवाची 30 फूट उंच मूर्ती
27 रोजी होणार कार्यक्रम
अमळनेर : देश व महाराष्ट्र भरात गोदादेवी नवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते. या वर्षी देखील अमळनेर शहरात हा उत्सव साजरा करण्यात येणार असून सर्वांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे. जहारवीर गोगादेव नवमी उत्सव निमित्ताने उत्तर महाराष्ट्रात व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात प्रथमच ब्रम्हांडनायक महादेवाची 30 फूट उंची मूर्तीचे आगमन 27 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. तरी अमळनेर तालुका वासियांना दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नारायण कलोसे, बजरंग हटवाल, सुनील, चिरावंडे आयोजक मा. नगरसेविका मायाबाई लोहरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष लोहेरे व श्रीराम युवा ग्रुप यांनी केले आहे. मिरवणुकीचा मार्ग श्रीराम मंदिर गांधलीपुरा पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत राहणार आहे.