नगाव बु, नगाव खु, व धुपी वि.का. सोसायटीची बिनविरोध निवड..

0

महेश पाटील यांची चेअरमन तर व्हाईस चेअरमन पदी वंदना पाटील

अमळनेर : तालुक्यातील नगाव खु.बु. व धुपी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी महेश पाटील तर व्हाईस चेअरमन पदी वंदना रावसाहेब पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुनील महाजन व राजेंद्र वाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड संपन्न झाली. नगाव खु.बु. व धुपी विविध कार्यकारी सोसायटीचे सेक्रेटरी व माजी चेअरमन प्रवीण गोसावी तसेच तुषार बोरसे या दोघांनी नाव सुचवून अनुमोदन दिले.

दरम्यान या निवडीबद्दल चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!