पांझरा काठी वाळू माफियांचा सुळसुळाट…
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
अमळनेर : तालुक्यातील पांझरा नदी काठी वाळू माफियांचा सुळसुळाट मजला असून अवैधपणे मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केली जात आहे. रात्री 8 ते सकाळी 8 असा 12 तासांचा वेळ त्यांनी जणू ठरवून घेतला असल्याचे समजते. पांझरा काठावरील कळंबु, बाम्हणे यांसह काही ठिकाणी ही वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. म्हणून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करणे सोडून लक्ष देण्याची गरज आहे.