प्रताप महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात माजी विद्यार्थ्यांचे व्याख्यान संपन्न
अमळनेर : प्रताप महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात नुकतेच एक विशेष स्वरूपाचे अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यात प्रामुख्याने महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी काईरल अकॅडमीचे संस्थापक प्रा. अविनाश राजेंद्र मोरे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या पदव्युत्तर शिक्षणानंतर भविष्यात कारकीर्द कशी घडवावी व काय करावे ? या संबंधी मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
प्रस्तुत व्याख्यानात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते.
अविनाश मोरें बद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी २०१६ साली प्रताप महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयाची पदवी संपादन केली. त्यानंतर २०१८ मध्ये पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. प्रा. अविनाश मोरे हे सेट,नेट आणि गेट परीक्षा उत्तीर्ण असून सीएसआयआर नेट परीक्षा सात वेळा उत्तीर्ण होण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्यांना आयएफएस पुणे, केम अकॅडमी दिल्ली, आणि फिजिक्स वाला या ऑनलाइन शिक्षण संस्थेत काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्याच धर्तीवर त्यांनी त्यांच्या स्वतःची शैक्षणिक संस्था (काईरल अकॅडमी) स्थापन केली. आज या अकॅडमीत ११ उच्च विद्याविभूषित शिक्षकांचा भरणा असून एक हजारा पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आणि बारा हजारा पेक्षा जास्त युट्युब सबस्क्राईबर्स आहेत.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.संतोष दिपके यांनी केले तसेच रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.निलेश पवार यांनी आपल्या स्वागत भाषणाने विशेष अतिथींचे स्वागत केले आणि अविनाश मोरे यांनी संपादित केलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तरपणे माहिती दिली.
त्यानंतर प्रा.अविनाश मोरे यांनी त्याचे शैक्षणिक जीवनातील अनुभव आणि त्यांच्या संघर्षाच्या कथा सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले तसेच विविध करिअर पर्यायाबद्दल माहिती व रसायन क्षेत्रात रोजगाराच्या संधी आणि आव्हाने याबद्दल चर्चा केली.
या प्रसंगी रसायनशास्त्र विभागाचे माजी प्रा.डॉ.जयेश गुजराथी, प्रा.पराग पाटील, प्रा.डॉ मिलिंद ठाकरे, प्रा.डॉ.तुषार रजाळे, प्रा.डॉ.रवि बाळसकर, प्रा.डॉ.विवेक बडगुजर, प्रा.अमोल मानके, प्रा.वैशाली राठोड, प्रा.रामदास सुरळकर, प्रा.हर्षल सराफ, प्रा.सौ.मनीषा मोरे, प्रा.सौ प्रियांका देसले आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्रा.डॉ अरुण बी जैन, सह सचिव प्रा.डॉ.धीरज वैष्णव, आय क्यू ए सी समन्वयक प्रा डॉ मुकेश भोळे, कुलसचिव श्री राकेश निळे यांनी विशेष सहकार्य केले.