अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल…

मुलीच्या घरच्यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास मुलीच्या वडिलांना समजले की, आपली मुलगी घरी नाही. तिचा शोध घेतला असता ती कोठेही मिळुन आली नाही. तेव्हा त्यांना समजले की, गल्लीतील अजय भिल हा देखिल दुपार पासुन घरी परत आलेला नसून त्याचा देखिल त्याचे आई व नातेवाइक शोध घेत आहेत. तेव्हा मुलीच्या घरच्यांना खात्री झाली की, अजय याने त्यांची अल्पवयीन मुलगी वय 17 वर्ष 2 महीने हिला काहीतरी अमीष दाखवुन व फुस लावून पळुन घेवुन गेलेला आहे. काल बुधवार पर्यंत त्यांचा त्यांनी शोध घेतला असता ते कोठेही मिळुन आले नाहीत. म्हणुन अजय भिल्ल याच्या विरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.