रांगोळीकार खुशी भदाणेचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक..
खुशी सुप्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाणे यांची आहे कन्या…

अमळनेर : सोमवारी अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची “जन सन्मान संवाद” यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमळनेर शहरात आले होते. त्यांची पोस्टर रांगोळी सुप्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाणे यांची कन्या खुशी भदाणे हिने प्रताप महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात रांगोळी काढली होती. अजित पवार यांची रांगोळीच्या माध्यमातून प्रतिमा तयार केली होती. खुशीने रांगोळीने काढलेली प्रतिमा व इतर रांगोळीचे अजित पवार यांनी बराच वेळ निरीक्षण केले व खुशीला मंचावर बोलावून तिचे कौतुकही केले. भविष्यवात काही अडचण आल्यास मला फोन कर असेही खुशीला अजित पवारांनी सांगितले आहे. व पुढील शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुशीला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आपल्या पायावर पाय ठेवत मुलीला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी बोलावून तिचे कौतुक केले हे पाहून तेथे उभे असलेले खुशीचे वडील रांगोळीकार नितीन भदाणे यांचेही डोळे पाणावले व त्यांनी खुशीवर गर्व असल्याचे दिव्य लोकतंत्रशी बोलतांना सांगितले.

