17 ऑगस्ट रोजी अमळनेरात भव्य सर्व धर्म परिषद
अमळनेर शहरात जातीय सलोखा व शांततेसाठी महिला मंच व पोलीस स्टेशन चा उपक्रम

अमळनेर : अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्म परिषद २०२४ चे आयोजन शनिवार दि 17 ऑगस्ट रोजी अमळनेर शहरात करण्यात आले आहे.
अमळनेर शहरात, धर्माधर्मात सलोखा, शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण असावे यासाठी या सर्वधर्म परिषदेचे आयोजन केले आहे.सर्व महामानव सर्व धर्माचा आदर करतात, आपण का नाही ?आपण कोणत्याही धर्माचे असा, प्रथम माणूस बना शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही,मानवता हाच खरा धर्म आहे हाच संदेश या सर्व धर्म परिषदेतून देण्यात येणार आहे.या परिषदेत वक्ते म्हणून जयसिंग वाघ,साध्वीजी प्रशम निधीजी म.सा. भिक्षू नागसेन खान्देश, मकसूद बोहरा ,केरसी करंजीया, संत बाबा धीरजसिंघजी, मुफ्ती हरुन नदवी, रेव्हरंड विशाल गावित आणि वेदमुर्ती भागवतकार अमोल शुक्ल हे विविध धर्माचे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेचे समालोचक माजी प्राचार्य तथा नॅनो संशोधक व अभ्यासक डॉ.एल.ए.पाटील हे असणार असून सदर परिषद दि 17 ऑगस्ट रोजी सकाळी 3.30 वाजता बन्सीलाल पॅलेस, प्रताप मिल अमळनेर येथे होणार आहे.सदर परिषदेत सर्व महिला व पुरुष बांधवाना निमंत्रित करण्यात आले असून आपल्या शहरात जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी जास्तीतजास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महिला मंच ट्रस्ट अध्यक्ष डॉ. अपर्णा मुठे अध्यक्ष,सचिव सरोज भांडारकर,कोषाध्यक्ष सौ कांचन शहा,प्रकल्प प्रमुख वसुंधरा लांडगे व अमळनेर महिला मंच ट्रस्ट आणि अमळनेर पोलिस स्टेशन यांनी केले आहे.
