अजित पवारांसोबत कृषिभूषण साहेबराव पाटलांची लुकाछुपी..
कृषिभूषण कुठं आहेत यावर उत्तर मिळताच अजित पवार राजभवनातुन निघाले बाहेर
कृषिभूषण पाटील यांच्या बद्दल होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम…

अमळनेर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी सोमवारी अजित पवार यांच्यासोबत लुकाछुपी खेळल्याचे दिसले. साहेबराव पाटील व मंत्री अनिल पाटील यांचे काही दिवसांपासून तात्विक वाद होते. ते मिटले असल्याचे काही दिवसांपूर्वी मंत्री अनिल पाटील यांच्याकडून व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले होते व तसे फोटो देखील सामाजिक माध्यमांवर सर्वत्र पसरले होते. त्यानंतर या सर्व प्रकारावर माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी चुप्पी साधली होती मात्र त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले गेले की तसे काहीही झालेले नाही. या बाबत ९ तारखेला भूमिका जाहीर करू असेही सांगितले गेले. मात्र ९ तारीख गेली आणि मतदार संघातील जनतेला जणू विश्वासच बसला होता की, मंत्री अनिल पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे मनोमिलन खरंच झाले. मात्र सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्या दरम्यान साहेबराव पाटील गैरहजर राहून या सर्व गोष्टींना पूर्ण विराम मिळाला असून साहेबराव पाटील यांच्या बाबतच्या अनेक चर्चा खोट्या ठरल्या आहेत.
आज कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे लाडके व निकटवर्तीय अजित पवार हे साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन देखील साहेबराव पाटील त्यांना भेटले नाहीत. कुठं तरी अज्ञात स्थळी साहेबराव पाटील असल्याचे सांगण्यात आले. व अनेकांनी फोन वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र साहेबराव पाटील नॉट रीचेबल होते.
मात्र सोमवारी संध्याकाळी दिव्य लोकतंत्रने संपर्क साधला असता कृषिभूषण पाटील म्हणाले की,

मी दाखवलेल्या विश्वासाला काही माझ्याच जवळच्या लोकांनी तडा दिला… माझ्याबद्दल उलट – सुलट गोष्टी पसरवल्या गेल्या. माझे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चांगले व घनिष्ठ संबंध आहेत. मात्र काही लोकांमुळे आज त्यांना भेटता आले नाही. असे कृषिभूषण पाटील यांनी म्हटले आहे.
