अमळनेरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करा… राष्ट्रवादी – SP पक्षाची मागणी
पोलीस अधिक्षकांना दिले निवेदन…

अमळनेर : शहरातील शाळा महाविद्यालय व क्लासेसच्या बाहेर टारगट – विकृत – शाळाबाह्य मुलांच्या वाढलेल्या टवाळखोरीमुळे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थीनीच्या शिक्षणावर परिणाम होत आहे या सर्व गोष्टींना आळा बसावा म्हणून पोलिसांची गस्त त्या भागात वाढवावी या असे निवेदन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांना मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्याम पाटील, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.बी. एस. पाटील, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, प्रा.अशोक पवार, अक्षय चव्हाण, आरती पाटील, धनश्री चव्हाण, वसुंधरा लांडगे, गिताली बेहरे, उर्वशी पाटील, आशुतोष पाटील, राहुल बिऱ्हाडे, बापूराव पाटील, दर्पण वाघ, शुभम पवार, देव गोसावी, यश हापसे, अजिंक्य चीखलोदकर, सोहम शिंदे, राहुल पाटील, उज्वल मोरे, निलेश पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
