उरण व धारावी येथील घटनेचा अमळनेरात निषेध…
बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून अमळनेर तहसीलदारांना निवेदन
अमळनेर : उरण येथील यशश्री शिंदे व धारावी मध्ये धीरज वैश्य या दोघांच्या हत्येच्या विरोधात आज मंगळवारी अमळनेर येथील बजरंग दल व विश्व हिंदू परीक्षण यांच्या मार्फत तहसीलदार अमळनेर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, हिंदू धर्मावर सतत आक्रमण होत आहेत अनेक तरुण-तरुणीची निघृण पणे भर रस्त्यात हत्या केली जात आहे अशीच एक घटना उरण मध्ये हिंदू तरुणी यशश्री शिंदे लव जिहादची शिकार होऊन तिची जीहाट्यानी दिनांक 27/07/2024 रोजी लवजीहादच्या माध्यमातून रोडरोमिओ जिहादी मानसिकतेच्या वृत्तीने हिंदू तरुणीची एकतफी प्रेमातून निघुण पणे हत्या केली हाती, ही महाराष्ट्राला व हिंदू समाजाला भेडसावणारी खूप मोठी समस्या आहे.
तसेच दिनांक 29/07/2024 रोजी धारावी मध्ये हिंदू तरुण अरविंद वैश्य हा काहीही चूक नसताना याच जिहादी व हिंदू विरोधी मानसिकतेचा शिकार बनला, भर रस्त्यामध्ये निघृण पणे हत्या करून त्यालाही या जिहादी वृत्तीच्या मानसिकतेने संपवले, हिंदूंवर होणारी आक्रमणे हा खूप मोठा विषय बनला असून हिंदू धर्मात दहशत निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, सदरील दोन्ही घटने मधील आरोपी व त्याच्या साथीदारांना कठोरात कठोर शासन व्हावे व जिहादी मानसिकता समूळ नष्ट व्हावी, यात शासनाने तात्काळ कार्यवाही करून बेकायदेशीर पणे चालणाऱ्या अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून दहशत निर्माण करणे व कायदा हातात घेऊन हिंदू समाजाला लक्ष करून हल्ले करणे या सारख्या घटना होऊ नये या साठी कठोर कार्यवाही करण्यात यावी, तसेच हिंदू समाज्याच्या सहनशीलतेचा उद्रेक होण्यापूर्वी शासनाने गांभीर्याने कार्यवाही करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज यांच्या मार्फत करण्यात आली आहे.
सदर निवेदन देते वेळी डॉ. संजय शहा, सचिन चौधरी, अमर सोनार, मनोज मराठे, सचिन माळी, राजेश खरारे, मितेश कामदार, विजय पाटील, मुकेश परदेसी, भूषण महाजन, योगिराज चव्हाण, कल्पेश पाटील, सूरज परदेशी, कृष्णा पाटील, दिनेश पाटील , गोपाल वाघ , पवन बारी, हितेश हटकर , जयेश परदेशी, तेजस भोई, पवन भोई आदी उपस्थित होते.