माजी आमदार शिरीष चौधरी मंत्री अनिल पाटील व २०१९ मध्ये दगा देणाऱ्यांविरुद्ध गरजले….

0

बुधवारी संपन्न झाला शिरीष चौधरी मित्र परिवाराचा मेळावा

आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे केले स्पष्ट…

अमळनेर : येथे बुधवारी शिरीष चौधरी मित्र परिवाराचा पदाधिकारी मेळावा अमळनेरातील अंबिका मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी व शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चौधरी हे मंत्री अनिल पाटील व २०१९च्या निवडणूकित दगा देणारे तसेच इतर काहींवर चांगलेच गरजले. अमळनेर विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. रवींद्र हिरालाल चौधरी हे होते.

पदाधिकाऱ्यांशी सवांद साधताना माजी आमदार शिरीष चौधरी हे मंत्री अनिल पाटील यांच्यावर चांगलेच गरजले त्यांनी ते म्हटले कि, मागील पाच वर्ष माझा मतदार संघ विकास कामात मागे पडला आहे .त्याची उणीव आपल्याला दिसत आहे. २०१४ ते २०१९ चा कामाचा आलेख जनते समोर आहे. हे सांगण्याची गरज नाही. आज मी माजी आमदार जरी झालो, तरी माझ्या परीने तालुक्यात वेगवेगळ्या पद्धतीने विकास कामे आणण्याचा माझा प्रयत्न सुरूच आहे. ज्या पद्धतीने ग्रामीण भागात असो व शहरात असो. रस्ता, पथदिव्यांच्या माध्यमातून विकास साधण्याचा माझा प्रयत्न आहे. कोरोना काळात माय-बाप जनता जनार्दनाची सेवा आपण करण्याचा प्रयत्न केला त्यात मात्र राजकारण झाले. रेमडीसिव्हरच्या नावाखाली माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला मात्र एक गुन्हा काय शंभर गुन्हे दाखल झाले तरी अश्या गुन्ह्यांना मी भिक घालत नाही समाजाची सेवा करण हा माझा पिंड आहे. आम्ही ८० टक्के समाजकारण व फक्त २० टक्के राजकारण करण्याचे काम करीत असतो म्हणून त्याची चिंता मी करीत नाही. मतदार संघातील जनताजनार्दनाचा आशीर्वाद, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची साथ भक्कम पणे माझ्या पाठीशी आहे. व सदैव ती अशीच राहो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण सर्व जण कामाला लागून आपण केलेली विकास कामे व समाजोपयोगी कामे गावा-गावात घरा-घरात मतदारांपर्यंत पोहचवा वेळो-वेळी ज्या आपल्याला हाक देईल त्यावेळेस आपण आमच्या पाठीशी उभे रहा असे आव्हान माजी आमदार चौधरी यांनी केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ. रवींद चौधरी आपल्या भाषणात म्हटले कि, मा.आमदार शिरीष चौधरींविषयी विरोधक चुकीची वल्गना करत आहेत असे वल्गना करणारे बरेच बघितले. वल्गना करणारे संपून पण गेले मात्र राम लक्ष्मणची जोडी आहे. सत्तर वर्षाच काय सातशे वर्ष पण हि जोडी तुटणार नाही व फुटणार नाही. कारण आपल्यासारखे बंधूंची साथ वरिष्ठांचे आशीर्वाद व जनतेने दिलेले प्रेम हे माझ्या परिवारावर आहेत, हे मी कदापि विसरणार नाही कोण काय म्हणतो त्या कडे लक्ष न देता शिरीष दादा विजयी कसे होतील असे काम आपल्याला आतापासून करायचं आहे. मागील दोन पंचवार्षिक पासून आपण सर्व जन दादांना सोबत आहात , व भविष्यात देखील राहाल यात तिळमात्र शंका नाही. आपण शिरीष दादांच्या हाकेला साथ द्या अशी विनंती त्यांनी केली. तर आगामी विधानसभा माजी आमदार शिरीष चौधरी हे अपक्षच लढतील अशी घोषणा देखील डॉ. रवींद्र चौधरी यांनी केली.

मेळाव्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण पाठक यांनी केले. तर माजी पंचायत समिती पारोळा गोकुळ चौधरी , गटनेते प्रवीण पाठक, पंकज चौधरी, माजी नगरसेवक गुलाब पाटील, माजी सभापती डॉ. दीपक पाटील, पारोळा शेतकी संघ संचालक व म्हसवेचे सरपंच सुभाष पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर संचालक शरद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर माजी संचालक शिवाजी गोसावी, माजी पांडुरंग महाजन , माजी नगरसेवक श्रीराम चौधरी , माजी नगरसेवक सलीम टोपी ,माजी सरपंच मोहाडी रामचंद्र पाटील , माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन , वसंत नगर येथील बबलू जाधव , माजी नगरसेवक अवि जाधव , नीम येथील माजी सरपंच भास्कर चौधरी ,माजी नगरसेवक बाळासाहेब संदानशिव, उत्तम वानखेडे, अधिकार सैंदाणे, माजी नगरसेवक कैलास भिल , महेंद्र भिल, प्रताप पारधी ,गुलाम नबी, आरिफ भाया, चंद्रकांत साळी, गोपीचंद कोळी, माजी नगरसेवक संतोष लोहरे, माजी नगरसेवक महेश जाधव , विजय भोई, पंकज भोई, रमेश धनगर, मांडळचे जितू पाटील , अक्षय अग्रवाल, दिनेश मणियार, मनोज शिंगाने , संचालक हरी भिका वाणी , राकेश गुरव आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!