खंडणी मागितल्या प्रकारणी अमळनेरच्या प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल….
शाळेस मिळणाऱ्या अनुदानातून हवी टक्केवारी ?
अमळनेर : पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्यावर खंडणी मागणे, शाळेची बदनामी करणे आणि जीवे मारण्याची धमकी देने प्रकरणी उमेश राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादीने दिलेली माहिती अशी कि, गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी फिर्यादी यांच्या शाळेबाबत बदनामीकारक मजकूर टाकला होता. या बाबत अमळनेर पंचायत समिती यांच्याकडे शाळेने अर्ज दाखल केला होता. त्याच्या नकली घेण्यासाठी फिर्यादी उमेश पाटील हे पंचायत समिती अमळनेर येथे आले असता. त्यांनी गट शिक्षणाधिकारी यांच्या दालनात जाऊन रावसाहेब पाटील यांना विनंती पूर्वक सांगितले कि आमच्या शाळेची बदनामी करू नका त्यावर रावसाहेब पाटील यांनी अर्वाच्च भाषेचा वापर करत २०१२ पासून तुमच्या शाळेला मिळालेल्या अनुदानातून मला पाच टक्के रक्कम तसेच RTE वर देखील पाच टक्के रक्कम संध्याकाळ पर्यंत मला आणून दे अन्यथा तुमच्या शाळेची मान्यता मी रद्द करतो. असे म्हणत फिर्यादीला मारून टाकण्याची देखील भाषा केली आहे. म्हणून या बाबत अमळनेर पोलिसात भारतीय दंड संहिता ३८४, २९४, ५०६ प्रमाणे खंडणी, शाळेची बदनामी करणे व जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.