लोकसभा कल…
स्मिता वाघांना स्व-व्यक्तिमत्त्वाचा होऊ शकतो फायदा तर पक्ष आणि इतर कारणाने नुकसान होण्याची शक्यता…
जळगाव : लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्ष तथा महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी त्यांच्या राजकीय जीवनात जे कमावलंय ते प्रशंसनीय आहे. एका महिलेने परिवार, नातेवाईक व इतर गोष्टी सांभाळत राजकारणात आपला दबदबा कायम ठेवणे ही खूप मोलाची व मोठी बाब आहे. जनमानसात जाऊन काम करणारं व्यक्तिमत्त्व स्मिता वाघ यांचं आहे. खेड्यापाड्यात फिरतांना जनतेला परिवारातील सदस्य असल्यासारखी वागणूक देणे हे जनतेला भावते. आणि म्हणूनच जळगाव लोकसभा मतदार संघात तथा अमळनेर विधानसभा मतदार संघात स्मिता वाघ यांना त्यांच्या स्व-व्यक्तिमत्त्वाचा फायदा होऊ शकतो .
मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात व देशात सुरु सुरू असलेले भारतीय जनता पक्षाचे राजकारण, डाव्या बाजूच्या व विरोधात बोलणाऱ्यावर होणाऱ्या कारवाया ह्या जनतेपासून लपून राहिलेल्या नाहीत. सत्तेसाठी काहीपण हे धोरण जणू भारतीय जनता पक्षाचे असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात भ्रष्टाचारी लोकांना आपल्या जवळ बसवून त्यांना सत्तेत सहभागी करून घेण्यासारखे अनेक कामं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाले असल्याची ओरळ जनतेतून आहे.
तर २०१९च्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन उमेदवार शिरीष चौधरी यांच्या पराभवास भारतीय जनता पक्षाचे स्थानीक नेतेच जबाबदार असल्याची चर्चा तेव्हापासून आजही अमळनेर विधानसभा मतदार संघात सुरू आहे. म्हणून शिरीष चौधरी यांचे काही जवळचे लोकं विरोधी उमेदवारास पाठिंबा देत असल्याचे दिसून येते.
आणि याचे नुकसान सुसंस्कृत राजकारण करणाऱ्या स्मिता वाघ यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.