पावत्या व इतर कागदपत्रे आहेत, तरी FIR!

0
IMG-20260923-WA0034

गोरक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांची कोंडी?

अमळनेरात गोरक्षकांची ‘दादागिरी’

 

अमळनेर : कायद्याचा रस्ता सोडून रस्त्यावरच न्यायालय भरवण्याचा अधिकार कोणी दिला? अमळनेरमधील बैल वाहतूक प्रकरणाने हा सवाल समोर आणला आहे. जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या पावत्या आणि व्यवहाराची कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असताना गाडीचा चालक व इतर लोकांवर गुन्हे दाखल झाल्याने गोरक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप होत आहे.

22 सप्टेंबर रोजी अमळनेर-गलवाडे रोडवरील अंबिका मंगल कार्यालयासमोर GJ-26-T-7446 आणि MH-18-AA-4261 या वाहनांवर कारवाई करण्यात आली. FIRमध्ये बैलांची निर्दयतेने वाहतूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात जनावरे व वाहने ताब्यात घेतल्याचेही नमूद आहे. हे वाहने बैल घेऊन एक अमळनेर व धरणगाव जात होती. 

पण दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे….

शेतकऱ्यांकडील पावत्या समोर असताना त्या व्यवहाराची संपूर्ण सत्यता तपासली का? जनावरे कुठून खरेदी झाली, व्यवहार कोणाकडून झाला, त्याची नोंद काय आहे आणि वाहतुकीसाठी आवश्यक नियमांचे पालन झाले की नाही – या सर्व बाबींची कागदोपत्री छाननी होणे अपेक्षित आहे.

गोरक्षणाच्या नावाखाली ‘दादागिरी’ चालणार का?

गाय-बैलांचे संरक्षण हा कायदेशीर विषय आहे; मात्र गोरक्षणाच्या नावाखाली एखाद्याला रस्त्यात अडवणे, दबाव आणणे किंवा कायद्याची भूमिका स्वतः बजावणे हा वेगळाच मुद्दा आहे. शेतकऱ्यांचा आरोप जर खरा असेल, तर हा प्रकार केवळ एका वाहनाचा किंवा दोन बैलांचा प्रश्न राहत नाही- तो कायदा कोण चालवणार, याचा प्रश्न बनतो.

गुन्हा असेल तर पोलिसांनी तपास करावा. नियमभंग झाला असेल तर कायद्यानुसार कारवाई व्हावी. पण खासगी व्यक्तींनीच संशयित ठरवायचे, चौकशी करायची आणि त्यानंतर पोलिसांकडे प्रकरण द्यायचे, अशी पद्धत रूढ होत असेल तर त्यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

शेतकरी आरोपीच्या भूमिकेत आणि ‘गोरक्षक’ न्यायाधीश ?

या प्रकरणातील सर्वात बोचरा मुद्दा हाच आहे. शेतकऱ्याने पावती दाखवायची, कागदपत्रे द्यायची आणि तरीही आधी संशयित ठरायचे – हा कोणता न्याय?

यात शेतकरी आरोपीच्या भूमिकेत असून गोरक्षक हे न्यायाधीश झाले आहेत. 

वाहतुकीचे नियम मोडले असतील तर त्याची शिक्षा कायद्यानुसार व्हावी. मात्र, कागदपत्रे असलेल्या व्यवहाराचीही निष्पक्ष तपासणी न करता केवळ संशय किंवा बाहेरील दबावावर कारवाई झाली असेल, तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे.

या प्रकरणात FIRमधील आरोप, शेतकऱ्यांकडील पावत्या, वाहनांची कागदपत्रे आणि पशुवैद्यकीय अहवाल यांची एकत्रित पडताळणी होणे गरजेचे आहे.

गोरक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांची मानहानी आणि दहशत सहन केली जाणार नाही; आणि दुसरीकडे कायदा मोडला असेल तर कोणालाही पाठीशी घातले जाऊ नये.

कारण गोरक्षण असो किंवा कायद्याची अंमलबजावणी – दोन्हींच्या नावाखाली ‘दादागिरी’ला कायद्यात जागा नाही. आता या प्रकरणात पावत्या काय सांगतात आणि प्रत्यक्ष तपास काय सांगतो, हे पोलिसांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे.

 

पोलिसांची भूमिका संशयस्पद

7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर त्या गुन्ह्यात अटक होत नाही, मात्र 3 महिने जेल व 200-300 रुपये दंडाच्या गुन्ह्यात पोलिसांनी लगेच थेट अटक करण्याची तत्परता दाखवली असल्याने पोलिसांचे तोंड भरून कौतुक केले जात आहे.

गोरक्षेच्या नावाने दहशत माजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार…. नरेंद्र संदानशिव – शेतकरी

शिरपूर येथील व्यापारी थोरात यांच्या कडून अमळनेर येथील शेतकरी नरेंद्र संदानशिव यांच्या कडे व धरणगाव येथील एका शेतकऱ्याकडे हे बैल जातं होते. यात अमळनेर येथील शेतकरी नरेंद्र संदानशिव यांनी गोरक्षणाच्या नावाने दहशद माजवणाऱ्या संबंधित गोरक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. संदानशिव यांचा एक बैल काही दिवसांपूर्वी वारला असल्याने त्यांनी ही बैलजोडी शेती कामासाठी मागवली होती, मात्र शेती कामाच्या वेळेतच पुन्हा अशी वेळ आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित गोरक्षक हे पैसे घेऊन गाड्या सोडतात व ज्यांनी नाही दिले ती गाडी पकडून पोलिसांच्या स्वाधीन करतात असा आरोपही त्यांनी केला आहे. म्हणून या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!