ब्रेकिंग न्यूज | अमळनेर तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ!

0
IMG-20260907-WA0010

कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यांना मारहाण; एक ट्रॅक्टर पळवून नेला

 

अमळनेर : तालुक्यातील पाडसे गावाजवळ अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कारवाईदरम्यान तलाठ्यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत असून, महसूल पथकाने एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला. मात्र, वाळू माफियांनी दुसरा एक ट्रॅक्टर पळवून नेल्याचे कळते.

दरम्यान, शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वाळू माफियांच्या मुजोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या घटनेचा सविस्तर वृत्तांत आणि अधिक माहिती लवकरच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!