ईद निमित्त भाया ग्रुपकडून पाणी वाटपाचा उपक्रम
मानवतेचा संदेश देत जुलूसमध्ये सहभागी नागरिकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप
अमळनेर : ईद निमित्त आयोजित जुलूसमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांसाठी भाया ग्रुपच्या वतीने पाणी वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. जुलूसदरम्यान नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी भैय्या ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.
उन्हाचा व गर्दीचा विचार करून जुलूसमध्ये सहभागी नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमातून मानवता, बंधुभाव, एकता आणि सेवा यांचा संदेश देण्यात आला.
ईद चा आनंद साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपत गरजू व जुलूसमध्ये सहभागी नागरिकांना पाणी देण्याचा उपक्रम राबविल्याबद्दल भैय्या ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“पाणी पाजणे हे नेक कार्य असून मानवतेची सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सामाजिक एकोपा आणि परस्पर बंधुभाव वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
