उद्या अमळनेर येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद दौरा

0
Screenshot_2026-06-05-10-55-31-483_com.google.android.googlequicksearchbox-edit

शिवसैनिकांना उपस्थितीचे आवाहन

 

अमळनेर : शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभर विधानसभा निहाय “शिवसंवाद दौरा” आयोजित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्याचा शिवसंवाद दौरा शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी अमळनेर येथे होणार आहे.

अमळनेर येथील हॉटेल मिड टाऊनमध्ये दुपारी २.३० वाजता अमळनेर, जळगाव ग्रामीण आणि चोपडा या तीन विधानसभा मतदारसंघांचा संयुक्त शिवसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेना धुळे संपर्कमंत्री भाऊसाहेब चौधरी, विभागीय सचिव आनंद परांजपे तसेच माजी खासदार व जळगाव संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या शिवसंवाद दौऱ्यामध्ये संबंधित विधानसभा मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून शिवसैनिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, संघटनात्मक कार्यातील अडचणी तसेच आगामी काळातील संघटन बळकटीकरणाबाबत चर्चा करून विविध प्रश्नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या कार्यक्रमास अमळनेर तालुक्यातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, शाखाप्रमुख, बूथप्रमुख तसेच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!