पुणे येथील गावठी दारू दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

0
IMG-20260605-WA0039

पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, विविध 20 गुन्हे दाखल; 15 आरोपी ताब्यात

 

अमळनेर : पुणे येथे गावठी दारूमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोपडा विभागात विशेष मोहीम राबवून अवैध दारू व्यवसायाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क जळगाव अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या नेतृत्वाखाली दि. १ जून ते ४ जून २०२६ या कालावधीत चोपडा, अमळनेर, धरणगाव व पारोळा तालुक्यांमध्ये व्यापक धाडसत्र राबविण्यात आले. या मोहिमेदरम्यान एकूण २० गुन्हे दाखल करण्यात आले असून १५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

कारवाईदरम्यान आरोपींकडून ७,४१० लिटर रसायन, २०० लिटर गावठी दारू, २०० लिटर ताडी तसेच एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ₹५ लाख ६० हजार ७९५ इतकी असल्याची माहिती विभागाने दिली.

ही मोहीम चिखलोत शिवार, शेळावे शिवार, गांधली, कलाली, सावखेडा, हिंगोली बुद्रुक, सुटकार आणि अडावद परिसरात राबविण्यात आली.

सदर कारवाईत निरीक्षक चोपडा अ. कै. सु. मोमीन, दुय्यम निरीक्षक जी. एस. मोरे, एन. पी. खपके, आर. के. फुसे तसेच कर्मचारी डी. एन. पाटील, एस. एस. पाटील, भूषण परदेशी आणि नितीन पाटील यांनी सहभाग घेत मोहिम यशस्वी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!