हेडावे गावाजवळ भीषण अपघात
दुचाकीस्वार ठार

अमळनेर : तालुक्यातील हेडावे गावाजवळ आज झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण मोटारसायकलवरून जात असताना ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की तरुण गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाला.
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
दरम्यान मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
