अमळनेर बसस्थानकासमोरील हॉटेल्सचे अतिक्रमण; वाहतुकीला अडथळा

0

प्रशासन झोपेत का, त्या हॉटेल्सच्या पार्किंग कुठं ? नागरिकांचा सवाल

 

 

अमळनेर : शहरातील बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर काही हॉटेल्सच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. विशेषतः प्रेम हॉटेल व हुजुरी हॉटेल येथे पार्किंगची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने ग्राहकांची वाहने सर्रास रस्त्यावरच उभी केली जातात. परिणामी, दिवसातून अनेक वेळा वाहतूक कोळंबून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सदर परिसर हा नेहमीच गजबजलेला असल्याने येथे थोडासा अडथळा निर्माण झाला तरी मोठा ट्रॅफिक जाम निर्माण होतो. बसस्थानकासमोरच ही परिस्थिती असल्याने प्रवासी, रिक्षाचालक तसेच स्थानिक नागरिक यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, या हॉटेल्सना बांधकाम व व्यवसायासाठी देण्यात आलेल्या परवानग्या, तसेच त्यातील अटी-शर्तींची पूर्तता झाली आहे का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. पार्किंगची सुविधा न देता व्यवसाय चालवणे हे नियमबाह्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक प्रशासन व नगरपालिकेने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित हॉटेल चालकांवर कारवाई करावी, तसेच रस्त्यावर होणारे अतिक्रमण तात्काळ हटवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!