आर. के. नगर भागात विहिरीमध्ये पडलेली गाय अग्निशमन दलाने काढली सुखरूप बाहेर
परिसरातील नागरिकांकडून कौतुक

अमळनेर : आज सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास आर. के. नगर परिसरातील ओपन प्लेसजवळील विहिरीत एक गाय पडल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दल तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या प्रयत्न करत अत्यंत शर्थीने बचावकार्य राबविले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे संबंधित गायीला कोणतीही इजा न होता सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.
या कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांनी तसेच नगरसेवक महेश देशमुख यांनी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
या बचाव पथकात अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी तसेच कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव यांचा समावेश होता. आरोग्य विभागाकडून समाधान केदार, आनंद बैसाणे, अक्षय अहिरे आणि राकेश शिरसाठ यांनीही मोलाची मदत केली.
या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
