अमळनेरमध्ये नगरसेवकाला मारहाण
अदखलपात्र गुन्हा दाखल

अमळनेर : येथील नगरसेवकाला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमळनेर येथील नगरसेवक भरत ललवाणी यांना शनिवारी रात्री “माझा भाऊ कुठे होता?” असा प्रश्न विचारण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. हा वाद क्षणातच चिघळत गेला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. ही घटना शहरातील लुल्ला मार्केट परिसरात घडली.
या घटनेत नगरसेवक ललवाणी यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आल्याची नोंद आहे. या प्रकरणी मनोज ठाकरे याच्या विरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
