अमलेश्वर नगर गोळीबार प्रकरण : आरोपीला २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
भूषण महाजन याच्यावर खुनाचा गुन्हा

अमळनेर: अमलेश्वर नगर येथील गाजलेल्या गोळीबार प्रकरणात आरोपी भूषण देविदास महाजन याला न्यायालयाने २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अरुण सुरेश महाजन यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता.
घटनेनंतर अमळनेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली होती. प्राथमिक तपासात ही घटना गंभीर स्वरूपाची असल्याचे समोर आले असून अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत आरोपीला २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आरोपीकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. तसेच या प्रकरणामागील इतर कोणतेही धागेदोरे आहेत का याचाही तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली आहे.
