अमलेश्वर नगर गोळीबार प्रकरणी खुनाचा गुन्हा; आरोपी अटकेत

0

अमळनेरात अनेक गावठी कट्टा विकल्याची माहिती

 

 

अमळनेर : अमलेश्वर नगर येथे रात्री गोळीबार झाला असल्याची माहिती समोर येताच मोठी खडबड उडाली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात मयताचा मित्र भूषण महाजन यानेच गोडी झाडून अरुण महाजन याचा खून केला असल्याचे उघड झाले असून भूषण देविदास महाजन याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषणला अटक करण्यात आली आहे.

अमलेश्वर नगर मधील अरुण सुरेश महाजन याचा भूषण देविदास महाजन यांच्या घरात गोळी लागून मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , एपीआय रवींद्र पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , मिलिंद सोनार , सुनील तेली ,प्रशांत पाटील ,उज्वल म्हस्के , विनोद संदानशिव , सूर्यकांत साळुंखे ,नितीन मनोरे ,शेखर साळुंखे आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहचले. भूषण च्या घराची झडती घेऊन काही नमुने तपासण्यात आले.

रात्री उशिरा अरुणचा भाऊ नरेंद्र याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की माझा भाऊ अरुण याने २७ रोजी रात्री सव्वा नऊ वाजता पत्नीला दवाखान्यात आणून पायी चालत मित्र भूषण देविदास महाजन यांच्या घरी गेला. थोड्या वेळात मित्राचा फोन आला की तुझा भाऊ चक्कर येऊन पडला आहे. भूषण च्या घरी गेल्यावर तेथे गर्दी जमली होती. जमलेल्या लोकांनी सांगितले की तुझ्या भावाला भूषण ने गोळी मारून ठार केले आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.

दरम्यान भूषण हा नाशिक येथील दोघांकडून कट्टे आणून अमळनेर व पारोळा येथे विकत असल्याची चर्चा सुरू आहे. त्याने अमळनेर व पारोळा देखील अनेक तरुणांना हे कट्टे विकले असल्याची माहिती आमच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली असून पोलिसांनी या बाबत कसून चौकशी करून कोंबिंग ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!