वैद्यकीय सेवेतून जनसेवेकडे डॉ. परिक्षीत बाविस्कर यांची वाटचाल
अमळनेर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करणारे डॉ. बाविस्कर आहेत तरी कोण ?

अमळनेर : नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसेना पक्षाच्या (शिंदे गटाच्या) अधिकृत ‘धनुष्यबाण’ चिन्हावर डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून त्यानंतर शहरात मतदारांमध्ये उत्साह संचारला आहे. डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर हे उच्चशिक्षित व निष्कलंक उमेदवार असून वैद्यकीय सेवेत त्यांचा बराच कालखंड गेलेला आहे. एम.बी.बी.एस. शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय, धुळे त्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकारी प्रा, आरोग्य केंद्र, मारवड ता.अमळनेर या ठिकाणी सुद्धा वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. एम.डी. नायर वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, हिंदुजा हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभाग तज्ञ म्हणुन सेवा दिली आहे. अशा विविध ठिकाणी त्यांनी आपली वैद्यकीय सेवा दिलेली आहे.
कौटुंबिक राजकिय वारसा
त्यांना राजकीय क्षेत्रात कौटुंबिक वारसा लाभलेला आहे. त्यांच्या काकू लक्ष्मीबाई प्रल्हाद बाविस्कर यांनी नगरसेविका म्हणून अमळनेर नगरपरिषदेत वर्ष २००० ते २००५ या कालावधीत जनसेवा केली होती. त्याचबरोबर त्यांचे बालपण सुध्दा याच मातीत गेले आहे. त्यांच्यामुळे डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर यांचा चेहरा अमळनेरकरांना नवीन नसून सुपरिचित असा आहे.
डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर यांच्या माध्यमातून जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातुन पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिर, हमाल, मापाडी, कामगार यांच्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यामधील शहर व ग्रामस्तरीय मोफत आरोग्य शिबिर व मार्गदर्शन, वनवासी जनकल्याण समितीमार्फत आदिवासी पाड्यांमध्ये आरोग्य शिबिरे व मोफत औषधी वाटप अशा अनेक प्रकारची मोफत सेवा सुरू असते.
अमळनेर शहराचा चेहरामोहरा बदलणार
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असुन नगरविकास खाते ही त्यांच्याकडे आहे. त्यांच्या माध्यमातून व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आहे यांच्या माध्यमातून व तसेच माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वात शहराचा विकास होऊन विविध योजना राबविण्यात येणार असे डॉक्टर बाविस्कर यांनी म्हटले आहे.
