अमळनेर नगर परिषद : प्रभाग ४-ब मधून परेश उदेवालांची उमेदवारी दाखल
अमळनेरच्या राजकारणात होणार परेश उदेवालचा उदय….

अमळनेर : आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ४-ब मधून तरुण उमेदवार म्हणून परेश उदेवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील राजकीय वातावरणाला उत्सुकतेची नवी दिशा मिळाली आहे.
उदेवाल हे समाजसेवेशी नाते असलेल्या कुटुंबातून आले आहेत. त्यांच्या आजोबांनी सलग पंचवीस वर्षे नगरसेवक म्हणून काम पाहिले होते. ही पार्श्वभूमी आणि परिवाराची सामाजिक परंपरा यामुळे परिसरातील काही मतदार उदेवाल यांच्या उमेदवारीकडे लक्ष देत आहेत.
अर्ज दाखल करताना उदेवाल यांनी तळागाळातील प्रश्न सोडवण्यावर भर देण्याची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “तरुणाईने पुढे येऊन प्रभागाचा विकास घडवण्यासाठी काम केले पाहिजे. लोकांच्या दैनंदिन अडचणी, पायाभूत सुविधा आणि सेवा-पुरवठ्यासाठी कार्य करणे हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे.”
स्थानिक पातळीवर उदेवालांच्या उमेदवारीला नेमका किती प्रतिसाद मिळतो आणि जनतेचा कौल कोणाकडे वळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग ४-ब मधील मतदारांच्या अपेक्षा, उमेदवारांची बांधिलकी आणि निवडणुकीतील पुढील घडामोडी येत्या काही दिवसांत स्पष्ट होतील.
