अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारीवर संभ्रम

0

इच्छुकांमध्ये वाढली अस्वस्थता

 

अमळनेर : नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा तिसरा दिवस सुरू असतानाही कोणत्याही आघाडी वा पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम व अस्वस्थता निर्माण झाली आहे.

तालुक्यात शहर विकास आघाडी, भाजप तसेच दोन्ही शिवसेना गटांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असल्या तरी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजपच्या झेंड्याखाली न लढता शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाईल का, याबाबत खासदार स्मिता वाघ यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. तसेच शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्रपणे उमेदवार देणार का, याबाबतही अनिश्चितता कायम आहे.

निवडणूक अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली असताना कोणत्याही आघाडीने अधिकृत उमेदवार जाहीर न केल्याने अनेक इच्छुकांनी अद्याप प्रचारालाही सुरुवात केलेली नाही. उमेदवारीसंबंधी सुरू असलेल्या या संभ्रमामुळे कार्यकर्ते आणि इच्छुकांची द्विधा मनःस्थिती झाली असून नेत्यांनी लवकरात लवकर अधिकृत उमेदवारांची घोषणा करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!