साहेबराव पाटील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतही पलटी मारणार का ?
अमळनेरच्या निवडणूका महायुतीने बिनविरोध पार पाडाव्यात; शिरीष चौधरींशी चर्चा करण्याचे आश्वासन

अमळनेर : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर आल्या असून सगळे पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना म्हणजे आताच शिवसेनेत प्रवेश घेतलेले शिरीष चौधरी यांचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला होता तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही कार्यकर्ता मेळावा आज संपन्न झाला. या मेळाव्याला आमदार अनिल पाटील व राजकीय पटलावरील सोंगाड्या मानले जाणारे माजी आमदार साहेबराव पाटील हे देखील उपस्थित होते.
माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या सोबत निवडणूक लढणार नाहीत असे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल पाटील यांनी जाहीर केले असून माजी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील स्वबळाचा नारा दिला आहे.
मात्र हे झाले असतांना देखील माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आज महायुतीत असलेले तिन्ही पक्षांनी सामंजस्याने अमळनेरच्या निवडणूका लढाव्यात व बिनविरोध करून घ्याव्यात अशी इच्छा प्रकट करत मी शिरीष चौधरी यांच्याशी चर्चा करेल असे आश्वासन देखील थेट मंचावरून दिले आहे. म्हणून निवडणूका बिनविरोधचा बहाणा करत साहेबराव पाटील पुन्हा राष्ट्रवादी कडून पलटी घेऊन दुसरी कडे कुठं जातात का ? की राजकारणापासून अलिप्त सांगत राजवड मधून कुण्या उमेदवाराचा प्रचार करतात हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.
कारण अमळनेरकरी जनतेच्या मनात साहेबराव पाटील यांच्या बाबत पलटीबाज पुढारी म्हणून ओळख निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.
