आ. अनिल भाईदास पाटील यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकत्यांसाठी मोठी पर्वणी

0

पाडळसरे धरणाचा पीएमकेएसवायमध्ये समावेश करून महिन्याभराआधीच जनतेला दिले गिफ्ट…. देविदास देसले

लेख : माजी मंत्री, अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व कार्यकुशल नेतृत्व श्री. अनिल भाईदास पाटील यांचा यंदा ५७वा वाढदिवस. दर वर्षी 7 जुलै रोजी कार्यकत्यांसाठी मोठा उत्सव असतो. कार्यकर्ता सोबत असल्याने दादांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा यंदाचा २३वा योग असल्याचे देविदास देसले यांनी सांगितले आहे.

आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे खंदे कार्यकर्ते व पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सदस्य असलेले देविदास लक्ष्मण देसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अमळनेर मतदार संघाचे आमदार म्हणून २०१९ पासुन श्री अनिल भाईदास पाटील प्रतिनिधीत्व करत असून जनहिताला नेहमीच प्राधान्य दिले. तालुक्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे अमळनेरसह सहा तालुक्याला संजीवनी ठरणारा निम्म तापी प्रकल्प पाडळसरे धरण असून पहिल्याच वर्षी बजेट मधून धरणासाठी भरघोस निधी आणला युद्ध पातळीवर कामाला ही सुरुवात केली. गतकाळात धरणाची उंची कमी करण्यात आली होती. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील व जलसंपदा अधिकाऱ्यांची मीटिंग लावून कमी केलेली धरणाची उंची वाढवून सर्व त्रुटीची पूर्तता करून कमी केलेले धरण 17 टीएमसीची मान्यता प्राप्त करून कामात सुरुवात केली. तुमच्या पहिल्या पाच वर्षाच्या काळात सरकार बदलले व निधीची वानवा भासू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीयनेते तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासोबत सत्तेत गेले आणि महायुतीचे सरकार स्थापन झाल्याने अनिल पाटील यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली. मंत्रिपदावर असताना मिळालेल्या संधीचे सोने करत विकास कामाची गंगा तालुक्यात आणली. सप्टेंबर 2009 मध्ये तिसरी सुप्रमाची मान्यता होती. 2024 पर्यंत पंधरा वर्षाच्या मोठा काळ उलटला धरणाची किंमत वाढवून 4890 कोटी ची मान्यता घेऊन 5 जानेवारी 2024 ला चौथी सुप्रमासह उपसा सिंचन योजनेची मान्यता घेऊन पाच उपसा सिंचन जलवाहिनीचे युद्ध पातळीवर काम निर्णायक टप्प्या पर्यंत पोहोचले आहे. केंद्र सरकारकडे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी आमदार म्हणून संकल्प पूर्व व सातत्याने केलेला भक्कम पाठपुरावामुळे केंद्रीय जल आयोगाची (CWC) 11 मार्च 2024 रोजी मान्यता मिळवून आणली.
धरणाचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यासाठी 10.40 टीएमसी चे असणार आहे . 2723 कोटी एकूण खर्च होणार आहे. महाराष्ट्र शासनाने मार्च 2025 पर्यंत एकूण खर्च 1147 कोटी केलेला असून 1999 ते 2019 वीस वर्षापर्यंत फक्त 495 कोटी खर्च झालेला होता. 2019 पासून आमदार अनिल पाटील यांनी साडेपाच वर्षात 652 कोटी भरीव निधी आणला. उर्वरित लागणारा खर्च 1576 कोटी मधून केंद्राच्या वाटा 859 कोटी पुरस्कृत आर्थिक मदत व महाराष्ट्र शासन 717 कोटी आर्थिक मदत होणार आहे. राज्य सरकारच्या वाट्याला एकुण 1864 कोटी भरीव निधी 71% व केंद्राच्या 29% फक्त आर्थिक सहकार्य राहणार आहे. पहिल्या टप्प्यात 32 हजार 328 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.


पाडळसरे धरण जन आंदोलन समितीने 2008 साला पासून निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण पूर्ण होण्यासाठी जनआंदोलन उभे केले. शासन व लोकप्रतिनिधी कडे सातत्याने माहिती समिती घेत राहिली. 2019 विधानसभेत तुम्ही गेल्यावर सर्वप्रथम निम्न तापी विकास महामंडळाचे अधिकाऱ्यांची मीटिंग लावली समितीचे सदस्यांना विश्वासात घेऊन सहभागी केले. त्यानंतर अनिल पाटील यांनी नऊ फेब्रुवारी 2022 तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील व समितीची बैठक आयोजित केली. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी केंद्रीय मंत्री जलशक्ती सी आर पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत अधिकारी, खासदार, समितीचे सदस्य यांची बैठक 2 सप्टेंबर 2024 रोजी दिल्ली येथे आयोजित केली. आमदार म्हणून सातत्याने महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडे केलेल्या भक्कम पाठपुराव्याच्या आधारे 12 जून 2025 रोजी पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड( PIB) ची मान्यता मिळाल्याने तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत अंतर्गत जीवनदायी ठरणाऱ्या प्रकल्पाचा समावेश करून अमळनेरकरांना व सहा तालुक्याच्या जनतेला एकप्रकारे आमदारांनी वाढदिवसाच्या संध्येला मोठे गिफ्ट दिले असून तुमचे आयुष्य दिर्घ राहो. धरणाचे उर्वरित कामही तुमच्या हातून, तुमच्या कार्यकाळात पूर्ण होवो ह्याच वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

लेख संकलन
देविदास लक्ष्मण देसले
पाडळसरे धरण जन आंदोलन समिती सदस्य


जाहिराती

 

 


 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!