दिव्य लोकतंत्रच्या बातमी नंतर प्रशासनाने घेतली शिवाजी महाराज पुतळ्याकडे धाव…
लवकरात लवकर पुतळा व नाट्यगृहावरील नाव दुरुस्त होणार… मुख्याधिकारी नेरकर
अमळनेर : “अवघ्या आठ वर्षांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास भेगा तर नाट्यगृहावरील नावही कोसळले, अमळनेर येथील नाट्यगृहाची परिस्थिती” अशा आशयाची बातमी दिव्य लोकतंत्रने काल ५ रोजी प्रकाशित केली होती. या बातमीने सर्वच क्षेत्रात खळबळ उडाली होती. बातमी प्रकाशित झाल्यानंतर काही वेळातच महाविकास आघाडीतील काही मंडळींनी पुतळ्याकडे धाव घेतली होती. तर पुतळ्यास तात्काळ दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी देखील झाली होती.
तर आज सकाळी अमळनेर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील याठिकाणी धाव घेतली व तात्काळ पुतळा बनवणाऱ्या ठेकेदारास बोलावणे केले आहे. हा पुतळा लवकरात – लवकर दुरुस्त केला जाईल असे अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले आहे.
पुतळ्याची पाहणी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, अमळनेर नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर, अभियंता डिगंबर वाघ, महेश जोशी आदींनी भेट दिली.
मा. प्रांतधिकारी मुंडावरे साहेब यांच्यासोबत नगर परिषद अभियंते यांच्यासह पुतळ्याची पाहणी केली, संबंधित ठेकेदारास कळविण्यात आले असून लवकरात – लवकर पुतळ्याची सुधारणा करण्यात येणार आहे.
तुषार नेरकर – मुख्याधिकारी
अमळनेर नगर परिषद