अवघ्या काही तासात आरोपींना अटक

अमळनेर : तालुक्यातील अमळगाव शिवारात किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना मध्यरात्री घडली. या या घटनेतील तिन्ही आरोपींना पोलिसांनी काही तासातच अटकही केली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, आम्लेश्वर नगर येथील रहिवाशी विकास पाटील हा तरुण मित्रांसह पिंगळवाडे येथे तमाशा पाहण्यासाठी गेला होता. रस्त्याने जात असताना एकाने मोटर सायकलाचा कट मारल्यावरून इंडिकेटर तुटले. त्यावरून दोन्ही गटात अमळगाव जळोद रस्त्यावर वाद विकोपाला गेला व त्याचे रूपांतर हाणामारी झाल्याने त्यात विकास पाटील या तरुणाचा खून झाला आहे. सदरची घटना ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली असल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत विकास पाटील याचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने घटनेतील तिन्ही आरोपींना जामनेर जवळून ताब्यात घेतले असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!