अण्णा व आबांमुळे पारोळा – एरंडोलचा विकास खुंटला

0

आता जनता कुणाला देणार चान्स ?

 

 

पारोळा : अण्णा म्हणजे सतीश पाटील व आबा म्हणजे चिमणराव पाटील यांच्या राजकारणामुळे पारोळा – एरंडोल मतदार संघाचा विकास खुंटला असल्याच्या जोरदार चर्चा मतदार संघात सुरू आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, भ्रष्टाचार, शिक्षण, रोजगार यांसारख्या अनेक बाबी मतदार संघात अडचणीच्या आहेत. या मतदार संघात अनेक गावांमध्ये आजही रस्त्यांचा विकास नाहीये. तर पाणीपुरवठेचा देखील हाच विषय आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत पारोळा आघाडीवर आहे, याठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी तीन लोकसेवक लाच घेताना पकडले गेले आहेत. याचे कारण म्हणजे लोकप्रतिनिधींचा लोकसेवकांवर दबाव नाही. पंचायत समितीत अनेक योजना मंजूर करून देण्यासाठी भाव ठरले असल्याची देखील माहिती आहे. तर शिक्षणासाठी देखील येथील विद्यार्थी अमळनेर, जळगाव व काही धुळे देखील जात असतात. रोजगाच्या विषयी देखील मोठी गंभीर समस्या मतदार संघात आहे.

शिवसेनेत झालेल्या बंडात विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांनी देखील बंड केला व शिंदेंची वाट धरली होती. मात्र येवढं करून देखील पारोळा – एरंडोल मतदार संघाच्या पदरी निराशाच आहे. तर आता चिमणराव पाटील यांनी त्याचे सिहांसन त्यांचा मुलगा अमोल पाटील यांच्याकडे देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून जनता त्यांचे हे स्वप्न पूर्ण करते की त्यांना बाजार समिती पर्यंतच मर्यादित ठेवते हे पाहणे गरजेचे ठरेल. कारण अमोल पाटील यांच्याबाबत मतदार संघात नकारात्मक वातावरण आहे.

तर माजी मंत्री सतीश पाटील यांनी देखील मंत्री पद भोगूनही मतदार संघास विकासाचा “वि” देखील दाखवला नसल्याचा आरोप काहींनी केला आहे.

म्हणून यावेळी जनता कुणाला पसंती देते की तिसरा पर्याय शोधते हे आता 23 नोव्हेंबरच सांगेल.

पुढील भाग लवकर….

समाधान मैराळे
मुख्य संपादक – दिव्य लोकतंत्र
मो. 9607110597

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!