अमळनेर मतदारसंघातील अजून सहा ग्रामीण रस्त्यांचे उजळले भाग्य… मंत्री अनिल पाटील

0

सुमारे 45 कोटी निधीतून रस्त्यांची होणार दर्जोन्नती

अमळनेर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा तीन अंतर्गत अमळनेर मतदारसंघातील अजून सहा ग्रामीण रस्त्यांचे भाग्य उजळले असून सुमारे 45 कोटी निधीतून या रस्त्यांची दर्जोन्नती होणार आहे.याबाबत ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रशासकीय मान्यतेचे आदेश दिनांक 8 ऑक्टोबर रोजी निघाले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी अमळनेर मतदरसंघांत नवीन रस्त्यांची मालिकाच अवतरली असल्याने शहर व ग्रामीण भागात दळणवळणास वेग आला आहे. मारवड ते बोहरा, मारवड ते शहापूर, कलमसरे ते शहापूर, खेडी – खवशी रस्ता आणि पळासदडे ते रामेश्वर जूनोने तर पारोळा तालुक्यातील खेडीढोक रस्ता या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी निधी मिळविल्याने ग्रामीण जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 

या रस्त्यांना मिळाली मंजुरी

१)प्रजिमा-४९ (मारवड) ते बोहरा रस्ता, एकूण लांबी ५.४००(कि.मी) अंदाजित किमंत ४००.५७ (रु.लक्ष ),
२)मारवड खेडी वासरे ते शहापूर रस्ता एकूण लांबी १०.४०० (कि.मी) अंदाजित किमंत १०३६.६८ (रु.लक्ष) ७०.५३ (रु.लक्ष), ३)कळमसरे शहापूर ते इजिमा-७७ रस्ता
(एकतास)एकूण लांबी ७.१०० (कि.मी),अंदाजित किमंत ७४५.४१ (रु.लक्ष), ४)रामा-३९ ते खेडी ढोक रस्ता, एकूण लांबी ३.००० (कि.मी),अंदाजित किमंत २८४.०९ (रु.लक्ष), ५)निंभोरा अमळगाव-खेडी-खवशी ते नांद्री रस्ता एकूण लांबी ११.३०० (कि.मी) अंदाजित किमंत ११११.०७ (रु.लक्ष), ६)पळासदळे-रामेश्वर ते जुनोने रस्ता एकूण लांबी १३.२५० (कि.मी), अंदाजित किमंत ९०९.३८ (रु.लक्ष), असे एकूण
५०.४५० (कि.मी) लांबीचे रस्ते ४४८७.२० (रु.लक्ष), निधीतून होणार असून विशेष म्हणजे ५ वर्ष देखभाल दुरुस्तीसह हे रस्ते मंजूर झाले असल्याने यासाठी २९६.०७ रु.लक्ष). रकमेस मंजुरी देण्यात आली आहे.

सदर रस्त्यांना मंजूरी दिल्याबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!