प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागाचा अभ्यास दौरा संपन्न
अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले. या शैक्षणिक सहलीचा कालावधी दि. १८ ते २१ सप्टेंबर २०२४ असा होता. या शैक्षणिक सहलीत पदवी आणि पदव्युत्तर या वर्गांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या अभ्यास दौऱ्यात विविध अभ्यासक्रमातील अभ्यास विषय असलेल्या पाली , महड, महाड, रायगड किल्ला, हरिहरेश्वर, मुरुड जंजिरा, काशीद बीच, अक्षीचा शिलालेख, नागाव शिलालेख, दिवेआगर ताम्रपट, इत्यादी ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास विषयाचा प्रत्यक्ष परिचय करून घेतला. या सहलीमध्ये एकूण ४२ विद्यार्थी तसेच विभागप्रमुख प्रा.ज्ञानेश्वर कांबळे या सहलीचे समन्वयक प्रा योगेश पाटील सह- समन्वयक प्रा.प्रतिभा पाटील डॉ.विलास गावीत आदी प्राध्यापकांचा या सहलीत सहभाग होता.या शैक्षणिक सहलीत रायगड किल्ला, चवदार तळे, अक्षीचा शिलालेख, नागवचा शिलालेख, इत्यादी स्थळांचे ऐतिहासिक महत्त्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.प्रस्तुत अभ्यास दौ-यात विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणची माहिती संकलित केली,ऐतिहासिक प्रत्यक्ष माहितीतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात एका प्रकारे भर पडली.