पर्यावरण संवर्धन व संरक्षण काळाची गरज : प्रा. डॉ. प्रकाश पाटील यांचे प्रतिपादन
प्रताप महाविद्यालयात व्याख्यान संपन्न
अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायक्त), राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान (रूसा) व भूगोल विभागाचा संयुक्त विद्यमानाने विशेष व्याख्यानाचे आयोजन भूगोल विभागात करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण जैन हे होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगून पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमूख डॉ. कैलास निळे यांनी केले तर प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. डॉ. किरण गावित यांनी करून दिला.
जागतिक ओझोन दिवसाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानाचे प्रमुख वक्ते किसान महाविद्यालय, पारोळा येथील प्रा. डॉ. प्रकाश डी. पाटील हे होते.
हवामान बदल ही सध्या जगातील सर्वात मोठी समस्या निर्माण झालेली आहे. १९ व्या शतकाच्या शेवटच्या दशकांमध्ये औद्योगीकीकरण आणि मानवाच्या अविवेकी वर्तुवणूकीमुळे पर्यावरणावर त्याचे गंभीर परिणाम झालेले आहेत. प्रस्तुत समस्यांपैकी ‘ओझोन वायूच्या क्षय’ ही गंभीर बाब सजीव सृष्टी समोर दत्त म्हणून उभी आहे असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, 1979 पासून आर्टिक महासागरातील हिम क्षेत्र सातत्याने कमी होताना दिसते. 100 वर्षात पृथ्वीचे तापमान सरासरी 0.8 अंशाने वाढले आहे. हवामान बदलाचा परिणाम वनस्पती आणि वन्य प्राण्यांवर पडताना आपल्यास निदर्शनास येते. भारतीय उपखंडातील पर्जन्याचे प्रतिमान बदलत असल्याचे काही वर्षातील संशोधनातून स्पष्ट होत आहे. सदर व्याख्यानात ओझोन वायूची निर्मिती स्थितांबर स्तरात कशी होते ? ओझोन वायूच्या ऱ्हासाची कारणे कोणती आहेत ? त्यावर उपाययोजना शास्त्रीय पद्धतीने स्पष्ट केले. याप्रसंगी प्रा.अमित शिरसाठ, प्रा. भूषण पवार, प्रा.चंद्रकांत जाधव,
प्रा.चंद्रशेखर वाढे, प्रा.प्रीतम पावरा आदी उपस्थित होते.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
डॉ. महेंद्र महाजन यांनी केले तर आभार प्रा.डॉ.प्रमोद चौधरी यांनी मानले.
प्रस्तुत कार्यक्रमास भूगोल विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर समारंभाच्या यशस्वीतेसाठी विभागातील कर्मचारी प्रवीण धनगर व महेश राजपूत यांनी परिश्रम घेतले.